Advertisement

आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव

प्रजापत्र | Tuesday, 10/08/2021
बातमी शेअर करा

 

मुलगा ऑनलाइन अभ्यास करत नसल्याचा राग अनावर झाल्याने आईने उशीने तोंड दाबून मुलाचा खून केला. नंतर स्वतःही घेतला गळफास लावून आत्महत्या केली. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृतदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करुन महिलेने आत्महत्या केली, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा सागर पाठक (३२) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने तोंड दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं मृतक महिलेने लिहिलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

 

 

 

हेही वाचा... 

  मोठी बातमी: अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने केली रद्द
http://prajapatra.com/2866 

 

 

 

Advertisement

Advertisement