Advertisement

चौदा हजार पदांसाठीच्या सरळसेवा भरतीचा विसर    

प्रजापत्र | Monday, 09/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारने आता एमपीएससीच्या जागा भरण्याचा  गांभीर्याने घेतला आहे , त्यानुसार लोकसेवा आयोगाकडे सर्व जागा भरण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र त्याचवेळी लोकसेवा आयोगाच्या  कक्षेत नसणाऱ्या वर्ग ३-४ च्या राज्यभरातील रिक्त जागांच्या भरतीसाठी मात्र सरकार फारसे उत्सुक नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदांनी सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात दिली होती, यात लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले, मात्र ती भरती झाली नाही, आणि आता सरकारला त्या भरतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाखो बेरोजगारांच्या भवितव्याशी खेळ होत आहे.

सन २०१९ मध्ये जि प सरळसेवा भरतीची एक जाहिरात आली होती. लाखो विद्यार्थ्यांनी फी भरून अर्ज केले होते . जि.प भरतीची जाहिरात निघून व अर्ज भरून दोन वर्षे होऊन गेली तरी या भरतीसाठी अजून परिक्षाच घेतली गेली नाही. राज्यात  जि प अंतर्गत लिपिक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका इ. संवर्गातील जवळपास चौदा हजार पदांसाठी ही भरती होणार होती. परंतु शासनाला या भरतीचा विसर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या पदरी अजून निराशाच आली आहे.

 

सरकार पातळीवर जिल्हा परिषद , महसूल आणि इतर विभागांमधील  भरती प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ आणि आरोग्य आणि आता पोलीस विभागातील भरती सुरु झाली आहे, ती सुद्धा २०१९ च्या रिक्त जागांवर, मात्र मागच्या २ वर्षात कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरवाले आहेत, त्या सर्वांना रोजगार मिल्ने आवश्यक आहे. यासाठी वर्ग ३-४ च्या सर्वच रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया वेगाने राबविणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत नसल्याने एका स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली, आता इतर परीक्षांची तयारी करणारांमधून  सरकारला अजून किती स्वप्नील लोणकर बघायचे आहेत ? विद्यार्थ्यांच्या भावनांशी चालू असलेला हा खेळ आता थांबवा व लवकरात लवकर ही रखडलेली भरती करा. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका अशा भावना बेरोजगारांमधून व्यक्त होत आहेत. 

 

हेही वाचा.. 
मराठवाड्यात डेल्टा प्लसचा शिरकाव
http://prajapatra.com/2853 

Advertisement

Advertisement