Advertisement

१५ ऑगस्टपर्यंत पीक विम्याची रक्कम द्या,अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालू         

प्रजापत्र | Thursday, 05/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० मधील पीक विम्याच्या रक्कम अद्याप मिळाली नसल्याने गुरुवारी (दि.५)  बीड-परळी महामार्गावरील घाटसावळी जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करत प्रलंबित विम्याची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.१५ ऑगस्टपर्यंत विम्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे. 

 

 

              बीड-परळी राज्य महामार्गावरील घाटसावळी येथे गुरुवारी (दि.५) सकाळी ११ वाजता दीड तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे १५ ऑगस्ट पर्यंत जमा करावेत ,फसवा बीड पीकविमा पॅटर्न रद्द करावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

 

 

 

या आंदोलनाला शिवक्रांती संघटनेचे गणेश बजगुडे, ऍड. प्रेरणा सूर्यवंशी,मनोज पाटील ,दत्तप्रसाद सानप यांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. या रास्तारोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,लहू गायकवाड पाटील, कमलाकर लांडे,सुरेश घुमरे, अरुण लांडे, धनंजय गुंदेकर,मनोज पाटील,  हनुमान सातपुते,प्रमोद पांचाळ, सुग्रीव करपे अशोक साखरे, प्रताप माने,कैलास थोटे, कानिफनाथ वीर, राजू वीर, महेश शिंदे, बप्पा दुबाले, भारत मते,

 

 हेही वाचा... 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक रौप्य 
http://prajapatra.com/2827

 

 

 

 

 

शिवाजी मते,प्रदिप घुमरे, साईनाथ गव्हाणे, अंकूश घुमरे, अंगद किवणे,विलास आबुज,आकाश गिराम, महेश पोकळे,श्रीमंत दुबाले,मधुकर लांडे,शदादेव लेंगरे, सिद्धेश्वर काळे, दत्ता मुंडे, रवींद्र मुंडे, बाळू नागटिळक, भैरवनाथ माने,आत्मराम दुबाले आदीसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनदरम्यान पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शरद भुतेकर ,पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Advertisement

Advertisement