बीडः बीड जिल्हा कारागृहाला मोठा धक्का बसला असुन कारागृह कोरोनाचे केंद्र बनले आहे. कारागृहातील तब्बल ५७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वेग मागच्या दोन दिवसात काहिसा मंदावला असतानाच रविवारी जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात कोरोनाने तांडव केल्याचे चित्र असुन कारागृहातील तब्बल ५७ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या ५७ व्यक्तींसह जिल्ह्यातील १२८ व्यक्ती रविवारी कोरोनाबाधित म्हणून समोर आले आहेत. यात बीड तालुक्यातील ७६ व परळी १७, तर अंबाजोगाई, आष्टी प्रत्येकी ८, धारुर ४, गेवराई ६, केज ४, माजलगावल २, वडवणी ३, पाटोदा १ असे रुग्ण आहेत.
बातमी शेअर करा