Advertisement

तहसील कर्मचाऱ्याला दलालाकडून मारहाण

प्रजापत्र | Wednesday, 04/08/2021
बातमी शेअर करा

गेवराई-येथील तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला खाजगी दलाल व त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

           गेवराई तहसिल कार्यलयात रेकॉर्डच्या बाहेर खाजगी दलाल सुनिल सुतार व त्यांच्या सोबत चार ते पाच जण मद्यप्राशन करून बसले होते.यावेळी एका सातबाऱ्यासाठी तहसीलचे कर्मचारी सुनील गित्ते यांच्याकडे सुतार व त्यांचे सहकारी गेल्यानंतर जुन्या सातबाऱ्यासाठी वाद घालू लागले.यावेळी सुनील सुतार व इतरांनी रेकॉर्ड रूममधील कागदपत्रे फेकून देत सुनील गित्ते यांच्या श्रीमुखात मारली.त्यामुळे गेवराई पोलीस ठाण्यात चौघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि मनिषा जोगदंड करत आहेत.

Advertisement

Advertisement