बीडः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अजुनही कोरोना मोडमध्येच असतानाच राष्ट्रवादीने मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी, सुचना आणि कैफियती ऐकण्यासाठी मंत्र्यांना आदेश दिले आहेत. आता राष्ट्रवादीचे मंत्री पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकणार आहेत. सोमवार ते शुक्रवार रोज तीन मंत्री वेगवेगळ्या वेळी पक्ष कार्यालयात बसुन कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आता कोरोना मोडमधुन बाहेर पडून कामाला लागली आहे. स्वतः शरद पवारांनीच आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पक्ष कार्यालयात बसुन कार्यकर्त्यांच्या कैफियती ऐकण्याचे आदेश दिले आहेत. ३० तारखेनंतर आता हे मंत्री पक्ष कार्यालयात बसून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
बातमी शेअर करा