Advertisement

इंडिकाच्या धडकेत वृध्द ठार

प्रजापत्र | Friday, 30/07/2021
बातमी शेअर करा

 

 धारूर दि.३० जुलै - धारुर तालुक्यातील जहागीरमोहा येथील उसतोड कामगार ज्ञानोबा बळीराम सिरसट (वय ६५) वर्ष यांना वडवणी येथे बीड-परळी रस्त्यावर इंडिका गाडीने धडक दिली. या अपघातात उपचार सुरु असताना त्यांचे बीड येथील रुग्णालयात निधन झाले.

जागिरमोहा ता. धारुर येथील ज्ञानोबा बळीराम सिरसट (वय ६५) हे वडवणी तालूक्यातील म्हातारा म्हसोबा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. पोखरी फाटा येथे परत येण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना एम. एच. १२ सि. आर. ६६११ या इंडीकागाडीने उडवल्याने ते गंभिर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

बीड येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. ते धारुर पोलिस ठाण्यात सफाई काम करणारे चंद्रकांत सिरसट यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज जागिर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement