गेवराई दि.१९ (वार्ताहार) तालुक्यातील राक्षसभूवनमध्ये आज सकाळी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी अवैध वाळु उपशा विरोधात तब्बल पंधरा हायवा गाड्यासह साडेचार कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर माहिती अशी कि , गेवराई तालुक्यातील अवैध वाळु उपश्याविरोधात आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची नजर आहे वाळू बाबतीत कसलाही फोन किंवा तक्रार आल्यास तात्काळ त्या ठिकाणच्या तहसीलदार आणि उपविभागीय अधीकारी यांच्यावर कारवाई केली जाईल असे आदेश पारीत झाल्यानंतर महसुल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज सकाळी नऊच्या दरम्यान गेवराईच्या महसुलमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे यामध्ये तब्बल पंधरा हायवा गाड्यासह साडेचार कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहितीतहसीलदार सचिन खाडे यांनी दिली आहे.