Advertisement

 रानडुक्कराच्या धडकेत एकाचा मृत्यू 

प्रजापत्र | Sunday, 18/07/2021
बातमी शेअर करा

 

 

परळी दि. १८ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मरळवाडी येथील शहरात रोज दूध विक्री करणाऱ्या एका दुधवाल्याच्या मोटारसायकला रान डुकराची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.मरळवाडी येथील दुध विक्रेते दररोज शहरात दुध विक्री करतात.

 

दुध विक्रेते काशीनाथ श्रीरंग आघाव (वय ४५) रविवारी (ता.१८) सकाळी परळीकडे दूध घेऊन जात असताना त्यांच्या गाडीसमोर मरळवाडी जवळ असलेल्या पिराजवळ अचानक रानडुक्कर आडवे आले. या रानडुक्करची मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने काशीनाथ आघाव दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आघाव यांचा मृतदेह  शवविच्छेदन करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांकडे देण्यात आले. मरळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

 

Advertisement

Advertisement