Advertisement

 पुण्यात ऑनर किलिंग! मुलीला घरातून पळवण्याच्या आरोपात दोन जणांची हत्या

प्रजापत्र | Saturday, 17/07/2021
बातमी शेअर करा

 

 

पुणे - खेड तालुक्यात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे प्रेयसीला पळवून नेणाऱ्या प्रियकराची आणि त्याच्या मित्राची मुलीच्या कुटुंबियांनी मारुन-मारुन हत्या केली आहे. हत्येनंतर दोघांचे मृतदेह चाकण परीसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहेत.आरोपींनी मुलीलाही अमानुष मारहाण केली आहे. तिचीही प्रकृती गंभीर आहे आणि ती रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत ९ लोकांना अटक केली आहे, यामध्ये मुलीचे वडील आणि एका हॉटेल व्यापाऱ्याचा समावेश आहे.

 

 

वरीष्ठ पोलिस अधिक्षक अरोश राजपूत यांनी सांगितले की, करंजविहिरे (ताल खेड) येथील २१ वर्षीय मुलगी, बालू सीताराम गावडे (२६) आणि राहुल दत्तात्रेय गावडे (२६) नावाच्या मुलासोबत १४ जुलैला गेली होती. सीताराम आणि राहुल दोघेही एका विटभट्टीत काम करायचे आणि सीतारामची मुलीसोबत ओळख झाली. मुलीचे वडील एक हॉटेल व्यवसायिक आहेत आणि त्यांचे करंजविहिरे येथे मोठी हॉटेल आहे. मृत बालू सीताराम गावडे हा पहिलेच विवाहत असल्याचेही बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमधील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि ही गोष्ट मुलीच्या कुटुंबियांना माहिती होताच त्यांनी मुलीचे घराबाहेर पडणे बंद केले. यानंतर १४ जुलैला सीताराम आणि राहुल कसेतरी मुलीच्या घरी पोहोचले आणि तिला आपल्या सोबत घरी घेऊन गेले. यानंतर दोघांच्या कुटुंबियांना त्यांची बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आणि मुलीच्या कुटुंबियांनी चाकण पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली.

 

 

मुलीच्या कुटुंबियांनी केवळ २४ तासांत तिघांना शोधले
खरेतर जवळपास २४ तासांनंतर मुलीच्या कुटुंबियांनी दोन्हीही मुलांसोबत तिला शोधले आणि तिघांना ते आपल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. आरोप आहे की, येथेच एका खोलीत त्यांना टॉर्चर करण्यात आले. त्यांना लाठी, काठ्यांनी आणि लोखंडांच्या रॉडने मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांना याविषयाची माहिती कुणीतरी दिली आणि चाकण पोलिस स्टेशनची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे मृतदेह एका खोलीमध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत.

 

 

आतापर्यंत ९ जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९ लोकांना अटक केली आहे. यामध्ये अनिल संभाजी कदले, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगळ, मुक्ता बाळू गावडे, आनंद सीताराम जाधव, बाळू मरगज (हॉटेल मालक) आणि ३ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वांविरोधात आयपीसी कलम ३०२ (हत्या)ची केस दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement