Advertisement

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर गोळी झाडली

प्रजापत्र | Saturday, 17/07/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि.१७ - जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले. हि घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

                  पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तुल लावून गोळी झाडली. मात्र गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement