Advertisement

 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

प्रजापत्र | Friday, 16/07/2021
बातमी शेअर करा

 

 

सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.बाईकवर डबल सीट जाणाऱ्या शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली. सतीश नारायण क्षीरसागर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील विजय सरवदे जखमी झाले आहेत.
 

 

चौघांना अटक

या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला पोलिसांकडून अटक झाली आहे.

 

 

बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारीचा राग

 

चार महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी केली होती. त्यानंतर बोगस नावे कमी करण्यात आली होती.याशिवाय, रमाई आवास योजनेच्या 28 मंजूर गायब फाईलींबाबतही शिवसेनेच्या या दोघा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement