बीड-जिल्हयात कालपासून कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या जवळपास आढळत असून अँटिजेन टेस्टमुळे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अँटिजेनमध्ये २३० कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्यानंतर रात्री उशिरा ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे दिवसभरात २६९ कोरोना रुग्ण सापडले.
सध्या जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये अँटिजेन टेस्ट सुरु असून बुधवारी अँटिजेनचा दुसरा दिवस होता. रात्री उशिरा ३९ जण पॉझिटिव्ह आले असून यामध्ये अंबाजोगाई ६, बीड २०, धारूर १, केज ३, माजलगाव २, पाटोदा ३, शिरूर ३ आणि वडवणीत एक रुग्ण सापडला. ५०९ अहवाल निगेटिव्ह आले.
बातमी शेअर करा