Advertisement

उद्यापासून सुरु होणार धर्मादाय कार्यालय

प्रजापत्र | Wednesday, 19/08/2020
बातमी शेअर करा

बीडः सार्वजनिक गणेश मंडळांना आपली नोंदणी करुन परवानगी घेता यावी यासाठी बीड शहरात lockdown असले तरी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण धरमकर यांच्या सहीने सदर आदेश काढण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय विभागाची परवानगी आवश्क असते. मात्र मागील आठ दिवसापासून बीड शहरात lockdown असल्याने सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय देखील बंद आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर नोंदणीच्या अडचणी होत्या. आता प्रशासनाने गुरुवार पासून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे आता गणेश मंडळांना नोंदणी करता येणार आहे.

Advertisement

Advertisement