Advertisement

लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रजापत्र | Thursday, 08/07/2021
बातमी शेअर करा

 

मुंबई(प्रतिनिधी):-  लातुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या सह अनेकांनी आज   राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती  प्रवेश केला. या प्रसंगी धुमाळ यांच्या सोबत प्रवीण सुरवसे माजी जि.प. सदस्य, वैभव म्हेत्रे, अनिलकुमार देवांग्रे, बालाजी लवे वंचित आघाडी, सचिन दोडके,  गुणवंत जाधव, संजय सावकार, बालाजी पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ, बळीराम माने आदींनी प्रवेश केला.

               याप्रसंगी पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा लातूरचे संपर्क मंत्री संजय बनसोडे, आमदार तथा लातुर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जनरल सेकेट्री शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डी. एन. शेळके, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, बबन भोसले, नरेंद्र पाटील व्यासपीठवर उपस्थित होते.
                 यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, निलंगा शहर अध्यक्ष इस्माईल लदाफ, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष विशाल पाटील, हसन चाऊस, राष्ट्रवादी युवक निलंगा तालुका अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, advt निहाल पटेल जिल्हा सचिव युवक, आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement