Advertisement

पत्रकाराच्या भावाला खुपसले

प्रजापत्र | Monday, 05/07/2021
बातमी शेअर करा

 

 

अविनाश इंगावले 

गेवराई- शहरातील बागवान कब्रस्थान या ठिकाणी सराईत गुन्हेगार असणाऱ्या माऊली आनंद बाप्ते यांनी पत्रकार जुनेद बागवान व त्यांच्या समवेत असणाऱ्या  एकास मारहाण केली. तसेच तु माझी बातमी का छापतो म्हणुन पत्रकार यांच्या मागे रिव्हॉल्व्हर घेऊन मागे लागल्या प्रकरणी गेवराई पोलीसांत तक्रार दाखल करत असतांना पत्रकाराच्या भावावर अज्ञात हत्याराने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे.

 

  याबाबत अधिक माहिती अशी की,अवैध धंद्याच्या बातम्या का छापतोस,याद राख या पुढे आमच्या विरोधात बातम्या देशील तर, तुला जिवे मारू'अशी धमकी देत पाच जणांनी पत्रकार जुनेद बागवान यांना रॉड, लाठ्या-काठ्याने मारहाण केली.यावेळी त्यांचा मित्र  शहानवाज शब्बीर बागवान हा देखील मारहाणीत गंभीर जखमी झाला होता.याप्रकारणात माऊली आनंद बाप्ते , सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते , राम शिवाजी म्हेत्रे , बबलू रमेश सावंत , शुभम आनंद बाप्ते या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना माऊली आनंद बाप्ते यांनी पत्रकार जुनेद बागवान यांच्या घरी जात धुमाकूळ घालत त्यांच्या भावावर अज्ञात हत्याराने वार केले.दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून गेवराई पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement