धारूर दि.२३ जून - येथील व्यापारी धनंजय शिरीष पिलाजी (वय ३८) यांनी दुकानातच आत्महत्या केल्याची घटना घडली
धारुर शहरातील मुख्य रस्त्यावर न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल सेंटर या दुकानाचे मालक धनंजय पिलाजी यांनी आज दि.२३ बुधवारी दुकानात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दुपारी हा प्रकार उघडकीस आल्याने धटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
धनंजय पिलाजी यांचा अत्यंत चांगला स्वभाव असल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सतत हसतमुख असणाऱ्या धनंजय यांच्या आत्महत्येमुळे शहरात शोककळा पसरली आहे . आत्महत्येचे कारण अस्पष्ट घटनास्थळी पोलीस निरिक्षक सुरेखा धस व त्यांची टीम दाखल झाली असून गर्दी हटवण्याचे काम सुरु आहे. घटनेचा पंचनामा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले .
बातमी शेअर करा