Advertisement

  दुचाकी व कारच्या अपघातात एक ठार

प्रजापत्र | Wednesday, 16/06/2021
बातमी शेअर करा

           धारूर दि १५.(प्रतिनिधी)- भरधाव वेगात येणाऱ्या कारने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तेलगाव येथील शिवाजी चौकात मंगळवारी रात्री घडली.

            यासंदर्भात माहिती अशी की, तेलगाव येथील शिवाजी चौकात असलेल्या हनुमान मंदिरात मारूती किसन साबळे हे पुजारी म्हणुन काम करतात.ते जवळच असलेल्या  भोपा ता.धारूर येथे राहतात. सध्या लाॅकडाऊन असल्याने मंदिर बंद आहे.त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मारूती साबळे मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी आले होते. यावेळी माजलगाव रोडने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने मारूती साबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ  दाखल केले.परंतु त्यांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात हलवण्यात आले. माञ येथे उपचार चालु असतानाच त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन करून भोपा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारूती साबळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
                  

Advertisement

Advertisement