Advertisement

'त्या' इसमाचा खूनच

प्रजापत्र | Tuesday, 08/06/2021
बातमी शेअर करा

 गेवराई-तालुक्यातील रांजणी जवळ सोमवारी (दि.७) एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.गेवराई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत तपासाची चक्रे गतिमान करून त्या इसमाचा शोध लावला.यावेळी पोलीस तपासात त्या इसमाचा खून झाला असल्याचे समोर आले असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी एक कार ही पोलिसांनी जप्त केली. 

 

        संपत भावडू  मराठा (वय-४५ रा.मनकवार पहाडीपार,जि.मध्यप्रदेश) असे मयताचे नाव असून रांजणी जवळ त्यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला .प्रथमर्दशनी हा अपघात असेल असे वाटत होते.नंतर मात्र तपासून या इसमाचा खून झाला असल्याचे समोर आले असून पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

Advertisement

Advertisement