Advertisement

लॉकडाऊन वाढणार मात्र काहीसा दिलासा मिळणार

प्रजापत्र | Thursday, 27/05/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी)-महाराष्ट्रातला लॉकडाउन १ जून नंतरही वाढविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील असे ते म्हणाले. 

 

गुरुवारी (दि.२७) कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील लॉकडाउन या विषयावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाउन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.

 

दोन दिवसात नियमावली जाहीर करणार  
लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाउनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं मत लॉकडाउन लगेच काढणं शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Advertisement

Advertisement