Advertisement

आज अँटीजनमध्ये आढळले शतकापेक्षा अधिक कोरोना रुग्ण

प्रजापत्र | Sunday, 09/08/2020
बातमी शेअर करा

बीड : शहरात कालपासून अँटीजन टेस्ट सुरु झाल्या असून यात व्यापारी मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. काल 87 रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तब्बल 137 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बलभीम कॉलेजमधून 17, वैष्णवी पॅलेसमधून 16, जिल्हा परिषद अशोक नगर मधून 31, राजस्थानी विद्यालयामधून 31, चंपावती 1 मधून 22 तर चंपावती विद्यालय 2 मधून 20 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले. 3170 लोकांची रविवारी अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. यात 137 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

Advertisement

Advertisement