मुंबई दि.१९ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात ११०० रुपयांवर वाढ करून तो आता १५०० रुपये इतका करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१९) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून तो १५०० रुपये इतका केलाय. ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून, त्यात महत्त्वाची भूमिका ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची आहे. बचतगटांच्या कर्जमंजुरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते. ग्राम पंचायतहद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरूपात दरमहा देण्यात येणाऱ्या ११०रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रकमेत सुधारणा करणे गरजेचे होते.त्यानुसार आता वाढ करण्यात आली आहे.