Advertisement

पंढरपूर मध्ये महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारले

प्रजापत्र | Sunday, 02/05/2021
बातमी शेअर करा

पंढरपूर – भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांचा भाजपचे समाधान आवताडे यांनी ३७०० पेक्षा अधिक मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे .

 

 

भारत भालके यांच्या निधनानंतर या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी होत होती,मात्र शरद पवार यांनी या ठिकाणी भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊन त्यांच्या विजयाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर टाकली होती,

 

दुसरीकडे भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी देत त्यांच्या विजयाची जबाबदारी आ प्रशांत परिचारक,खा रणजित नाईक यांच्यावर सोपवली होती .कोरोनाच्या काळात ही निवडणूक झाली .

 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर मतदारांमधून झालेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती .त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .मतमोजणी सुरू झाल्यानंतर पाहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे आवताडे हे ३६ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवून होते .आवताडे यांना एक लाख ४ हजार ९७ मते मिळाली तर भगीरथ भालके याना १ लाख ३९७ मते मिळाली,आवताडे यांनी ३७०० पेक्षा अधिक मताने विजयी झाले 

Advertisement

Advertisement