Advertisement

पाटोद्याच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची 'प्रगती'

प्रजापत्र | Thursday, 29/04/2021
बातमी शेअर करा

बीड-आपल्या अवतीभवती माणसांचा अव्याहत गराडा, वर्दळ असतानाही हल्ली सामाजिक अंतरासोबतच माणसा माणसांच्या मनातील अंतर दिवसेंदिवस कोरोनामुळे वाढत चालले आहे.एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला की त्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतोय.हल्ली पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे घटले असले तरी रुग्णांना आजच्या काळात सर्वाधिक दिलासा मिळतो तो डॉक्टरांचा.पाटोदा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांच्या आरोग्यात अशीच 'प्रगती' झाली ते डॉ.बिनवडे यांच्या वृत्तीमुळे.पाटोद्याच्या कोविड सेंटरमध्ये आज जे काही डॉक्टर उत्कृष्ट सेवा बजावत आहेत यात डॉ.प्रगती बिनवडे यांच्या नावाचा उल्लेख इथे आवर्जून करावा लागेल.

 

          कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह आहे.पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.पूर्वी गावातली एखाद्या घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह निघायचा,मात्र आता चित्र उलटे झाले आहे.घरातील एखादा सदस्य निगेटिव्ह येतो अन अख्ख घर पॉझिटिव्ह सापडतंय.वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असली तरी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा देण्यास तत्पर असल्याचे दिसून येते.आज पाटोदा तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज ७० ते ८० च्या घरात गेली असून कोविड सेंटरमध्ये रुग्ण हाउसपुल्ल होत आहेत.

 

 

यावेळी येथे उपचारासाठी आलेले अनेक रुग्ण विषाणू पेक्षा मानसिक आधाराने खचून गेल्याचे दिसून येतो.घरातील व्यक्ती जवळ नाहीत,उपचार करणारे अनोळखी मग कसं.... ? असे अनेक प्रश्न मनाची उलथापालथ करत असतात.आयुष्यात सकारत्मकपेक्षा अधिक नकारत्मक वातावरण शरीरात भिनत असते.अश्या वेळी खऱ्या अर्थाने रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते,आणि हाच  आधार आज पाटोदा कोविड सेंटरमध्ये डॉ.प्रगती बिनवडे या देत आहेत.इथे आलेल्या प्रत्येक रुग्णांना तो केवळ बाधित व्यक्त नव्हे तर परिवारातील सदस्य आहे,आणि तो ठणठणीत बरा झाला पाहिजे याकडे त्या सातत्याने धडपडता आणि योग्य उपचार करतात. ज्या रुग्णांचा स्कोर ९ च्या घरात गेला आहे अश्या व्यक्तींवर इथे यशस्वी उपचार करण्यात येत असून रुग्णांना ही कोविड केअर सेंटरबद्दल विश्वास वाढतोय.

 

आज या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बालकांना ही डॉ.प्रगती बिनवडे या हक्काच्या डॉक्टर वाढू लागल्या असून कोरोनावर मात करण्यासाठी ज्या मानसिक आधाराची गरज असते तो आधार त्यांच्या रूपाने प्रत्येक रुग्णांना मिळतोय.आणि विशेष म्हणजे हे आमचे मत नसून रुग्ण स्वतः हे बोलून दाखवितायेत.त्यांच्या कार्याबद्दल आभार अनेक जण मानत असून त्यांच्या हातून याच पद्धतीने अविरतपणे सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण त्या केवळ रुग्णांसाठी डॉक्टर नव्हे तर सर्वांगीण भूमिका साकारणाऱ्या व्यक्ती  बनल्या आहेत.आणि आज रुग्णांना हक्काच्या डॉक्टरांसोबत मानसिक धीर देणाऱ्यांची गरज आहे.

Advertisement

Advertisement