गेवराई दि-२६ ( वार्ताहार ) परभणी वरून औंरगाबादकडे जात असताना सिरसदेवी येथे समोरून येणा-या भरधाव टॅम्पोने दुचाकी स्वराला जोराची घडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची घटना सिरसदेवी याठिकाणी घडली .
रमेश लक्ष्मण डोळसे ( वय ४५ वर्ष ) रा .परभणी असे अपघातात ठार झालेल्या ईसमाचे नाव असुन तो परभणी वरूण आपल्या दुचाकी क्रं.एम २० एफ. सी १०३८ वरूण औंरगाबादच्या दिशेने निघाला असता मध्येच सिरसदेवी जवळ समोरून येणा-या टॅम्पोने जोराची घडक दिल्याने सदरील ईसमाचा मृत्यु झाला असुन त्यांच्या खिश्यातील आधार कार्ड मुळे त्यांची ओळख पटली. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असुन टॅम्पो चालक पसार झाला असल्याची माहीती सुत्रानी दिली आहे .
बातमी शेअर करा