Advertisement

लसीकरणावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

प्रजापत्र | Monday, 19/04/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement