Advertisement

आणखी 50 पॉझिटिव्ह तर 28 रुग्णांना सुट्टी

प्रजापत्र | Friday, 31/07/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडेसातशेच्या पुढे गेला असून शुक्रवारी 50 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 781 झाली आहे. तर शुक्रवारी 28 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील 416 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आज घडीला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 340 झाली आहे.
यामध्ये बीड शहरातील 26 रुग्ण असून कबाडगल्ली, रोशनपुरा, काळे गल्ली, दत्तमंदिर गल्ली, गणेशनगर, धनगरवाडी, वाचनालय रोड, एकनाथ नगर, गजानन नगर, माऊली चौक, आनंदनगर, जुनी भाजी मंडई , शहेंशाह नगर, दुधाळ कॉलनी, विठ्ठल मंदिर जवळ , आमीर कॉलनी , कुरेशी मोहल्ला , मक्कामस्जीदजवळ, मिल्लत नगर , दारुलउरुल फंक्शन हॉल जवळ आदी भागांतील रुग्णांचा तर  परळी शहरातील 14, अंबाजोगाईतील 4, गेवराई 3, माजलगाव 1 व धारुर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.

 

Advertisement

Advertisement