जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानात कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे आता लसही चोरीला जात आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात को-वॅक्सिनच्या 320 डोसची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात कोरोना लस चोरीची ही पहिली घटना आहे. आरोग्य विभागाने अज्ञात चोरांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे लस लगावणारं एखादं रॅकेट काम करत आहे की काय असा संशय पोलिसांना आहे. आरोग्य विभागही याची तपासणी करणार आहे.
लस चोरीच्या या घटनेमुळ खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तेव्हा लस चोरी झालेल्या ठिकाणी फक्त सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचार्यांच्या संगनमताने ही चोरी केली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बातमी शेअर करा