नवी दिल्ली : सीबीएससीच्या बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मे ते १४ जून दरम्यान सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा होणार होत्या. दहावीच्या ४ मे ते १४ मेच्या दरम्यानच होणार होत्या. यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल यापूर्वी झालेल्या परिक्षांच्या आधारावर देण्यात येणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला देण्यात आलेले मार्क्सवर त्याचा आक्षेप असेल, तर तो पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्यावर परीक्षा देऊ शकतो. बारावीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे.
१ जूनपर्यंत कोरोनाची काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतल्यानंतर सीबीएससी बोर्ड परीक्षांवर पुढील निर्णय घेणार आहे.
जर बारावीच्या परीक्षेची पुढील तारीख ठरवण्यात आली, तर त्या परिक्षेच्या तारखेच्या १५ दिवस आधी वेळापत्रक दिले जाईल, ते सर्वांना १५ दिवस आधी कळवलं जाईल. ११ राज्यांमध्ये सीबीएससीच्या शाळा या पूर्णपणे बंद आहेत. इतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या निर्णयानंतर परीक्षांबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे.