Advertisement

पत्रकार हत्या प्रकरणी आणखी एक मंत्री अडचणीच

प्रजापत्र | Saturday, 10/04/2021
बातमी शेअर करा

अहमदनगर – जिल्ह्यातील पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होत असून भाजपचे आजी आ शिवाजी कर्डीले यांनी याबाबत तनपुरे यांच्या चौकशीची मागणी केली आहे,त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे .

 

 

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मधील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. त्यामुळे त्यांची हत्या झाले असावी असा अंदाज होता.

 

 

आता त्यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असून या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाल्याचा आला आहे

त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी येण्याची शक्यता आहे.

 

राहुरीचे माजी आमदार कर्डिले हे थोड्या वेळापूर्वी या यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

Advertisement

Advertisement