नवी दिल्ली – राज्यातील पोलीस दलात जे काही वसुली कांड सुरू आहे त्यात मंत्र्यांची नाव येत आहेत,गृहमंत्री बाजूला झाले आहेत तर आता आणखी दोन मंत्र्यांची नाव आली आहेत त्यामुळे या महावसुली सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे .
एन आय ए च्या ताब्यात असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे शंभर कोटी वसुली चे टार्गेट दिले होते तर मंत्री अनिल परब यांनीदेखील आपल्याला बिल्डर लॉबी कडून शंभर कोटी वसूल करण्याचे आदेश दिले होते .
आपल्याला पुन्हा रुजू करून घेतल्याने नाराज असणाऱ्या शरद पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या व्यक्तीने शंभर कोटी रुपये वसूल करण्यासाठी दबाव आणला गेला अस पत्रात म्हटलं होतं .
या लेटरबॉम्ब नंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर आरोप केले .मोदी यांचे फोटो वापरून विजय मिळवलेल्या लोकांनी गद्दारी करून सत्ता मिळवली .मात्र पहिल्या दिवसापासून यांनी वसुलीचे सुरू केली आहे .या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अस म्हणत जावडेकर यांनी टीका केली .