Advertisement

गेवराई शहर आठ दिवस लॉकडाऊन

प्रजापत्र | Wednesday, 29/07/2020
बातमी शेअर करा

गेवराई शहरात कालपर्यंत कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आले असून त्यांच्या सर्व सहवासीतांचा शोध लागत नसल्याने शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून गेवराई शहर 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. तसेच गेवराई शहरातून कोणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा कोणाला शहरात येता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement