Advertisement

पोलिसांचा संशय खरा ठरला, पतीच निघाला पत्नीचा मारेकरी

प्रजापत्र | Wednesday, 31/03/2021
बातमी शेअर करा

केज दि.30 - पोलिसांना घटनास्थळी भेट घेतल्यापासून जो संशय होता तो अखेर खरा ठरला असून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना युसूफ वडगाव पोलिसांनी उघडकीस आणली आहे. तालुक्यातील जानेगाव येथे गुरुवार (दि. 25)रोजी रात्री आशा अनुरथ चटप वय (38) या महिलेची दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली होती.

 

       सदरील घटना घडल्यानंतर अप्पर पोलीस स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत,युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे सपोनि विजय आटोळे यांनी भेट देऊन उस्मानाबाद येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. युसूफवडगाव ठाण्याचे सपोनि विजय आटोळे यांनी चार दिवसात खुनाच्या तपासाचे चक्र गतीने फिरवले सदरील घटनेत शेतीच्या वादाच्या कारणावरून पती अनिल चटप याने पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे .सोमवार रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

 

                अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यादिवशी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.विविध प्रकारे चौकशी वरून तपास करून पती आरोपीविरुद्ध कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल केला असून सपोनि विजय आटोळे हे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत ,सपोनि दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement