Advertisement

प्रशासन नरमले;औरंगाबादमध्ये लॉकडाऊन रद्द

प्रजापत्र | Tuesday, 30/03/2021
बातमी शेअर करा

औरंगाबाद, 30 मार्च : औरंगाबादमध्ये  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 10 दिवसांचा मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, स्थानिक व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधामुळे प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे. औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे.

 

   औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर आता 10 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 30 मार्च ते 8 एप्रिल अशी तारखी सुद्धा ठरली होती. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आज 30 मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सुनिल चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे.

Advertisement

Advertisement