Advertisement

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक 

प्रजापत्र | Sunday, 28/03/2021
बातमी शेअर करा

अहमदाबाद: अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. यामुळे सरकारला काहीसं बॅकफूटवर जावं लागलं असताना दुसरीकडे गुजरातमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

 

अँटिलिया प्रकरणात सुरुवातीला सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे अडचणीत आले. त्यावेळी भाजपनं वाझे आणि शिवसेनेचे संबंध पुढे आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर देशमुख अडचणीत आले आणि शिवसेनेवर असलेला टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळला. पवार यांनी देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
 

Advertisement

Advertisement