केज दि.२६ - तालुक्यातील बोबडेवाडी येथील एक महिला तालुक्यातीलच माळेगाव येथील विहिरीत पडून मरण पावल्याची घटना उघडकीस आली आहे.
माळेगाव येथे युसुफवडगाव कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला अरुण शिवाजीराव लोकरे यांच्या विहिरीत दि.२६ रोजी एका महिलेचे प्रेत तरंगत असल्याची माहिती युसुफवडगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर प्रेत विहिरीच्या वर काढले. मयत महिलेचे नाव सुंदराबाई साहेबराव काळे वय ६० वर्ष रा. बोबडेवाडी ता. केज येथील असल्याचे समजते.
दरम्यान या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सपोनि संदीप दहिफळे व विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
बातमी शेअर करा