Advertisement

दुचाकी व मळीच्या टँकरचा अपघात एकाचा मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 17/03/2021
बातमी शेअर करा

केज दि.१७ - तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी हे अंबाजोगाई ला दुचाकीवरून जात असताना मळीच्या टँकर ची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
          तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी अशोक विठ्ठल गायकवाड (40) हे दि.16 रोजी रात्री 9 च्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून ( M H 44 - 3820) अंबाजोगाई ला नातेवाईकांकडे चालले होते. 

        दरम्यान ते होळ पासून जवळ असलेल्या कोद्री फाट्याजवळील पुलावर मळीच्या टँकर ची आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात अशोक गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बराचवेळ त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांचा मृतदेह पीएम साठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आला असून त्यांच्या सोनि जवळा या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement

Advertisement