पुणे-क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं दिल्लीतील एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील क्वारंटाइन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून सोमवारी रात्री पळून जायचा प्रयत्न केला होता. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणी खिडकीच्या गजामध्येच अडकली होती. अखेर खिडकीचे ग्रील तोडून तीची सुटका करण्यात आली.
पुण्यातील एरंडवणा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दिल्लीतील १८ वर्षाच्या एका तरुणीला क्वारंटाईन करण्यात आले होतं. मात्र सोमवारी रात्री या तरुणीने क्वारंटाईन सेंटरमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणीचा प्रयत्न फसला आणि ती खिडकीच्या ग्रीलमध्येच अडकून बसली. ही घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तरुणीला धीर देत हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने खिडकीचे गज तोडून तरुणीची सुखरुप सुटका केली. दरम्यान याप्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.