बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्हची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.मंगळवारी (दि.१६) आरोग्य विभागाच्या अहवालात पावणे तीनशे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.
आजच्या अहवालात २८३ जण पॉझिटिव्ह सापडले असून २३४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५८,आष्टी १५,बीड ९४,धारूर ५,गेवराई १५,केज १४,माजलगाव ४१,परळी २४,पाटोदा १०,शिरूर ३,वडवणी ४ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा