Advertisement

'त्या' क्लबशी संबंध नाही, जागा भाड्याने दिलेली - खांडे

प्रजापत्र | Sunday, 19/07/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड शहरातील एका क्लबवर छापा मारण्यात आल्यानंतर ती जागा शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले मात्र आपण ती जागा भाड्याने दिलेली असून त्याचे भाडेपत्रही आपण पोलीसांना दिले आहे. त्यामुळे त्या क्लबशी आपला काहीही संबंध नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे. सदर जागा भाड्याने दिल्याच्या वृत्ताला बीड शहर पोलीसांनी दुजोरा दिला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बीड शहरानजीकच्या एका क्लबवर छापा मारला होता. सदर जागा कुंडलिक खांडे यांच्या मालकीची असल्याचे पोलीसांच्या एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले होते मात्र आपण ती जागा यापूर्वीच भाड्याने दिलेली असून त्याचे भाडेपत्रकही करण्यात आलेले आहे. सदर भाडेपत्र आपण पोलीसांनाही दिले आहे. त्यामुळे त्या क्लबचा आपला कसलाही संबंध नाही. भाड्याने दिल्यानंतर त्या जागेत काय चालते हे मला आत्ताच कळाले असे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement