Advertisement

बीड जिल्हा बँकेबाबत झालाय हा निर्णय

प्रजापत्र | Thursday, 04/03/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लेखा परीक्षण नियमांचा फटका बसलेल्या इच्छु उमेदवारांना सहकार मंत्र्यांकडून देखील दिलासा मिळालेला नाही. बँकेच्या उपविधीतील लेखा  परीक्षण विषयक नियमाला आक्षेप घेणारी धनराज मुंडे यांची याचिका सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे सेवा सांठा मतदार संघातून अर्ज बाद झालेल्या इच्छुकांची जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा मार्ग सध्या तरी बंद झाला आहे. 
बीड जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु असून यात सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांवरील सर्व उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. बँकेच्या उपविधीनुसार सदर मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या संस्थेस लेखा परीक्षणाचा अ किंवा ब वर्ग आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात अशा केवळ ७ संस्था असून त्यापैकी कोणीही अर्ज भरले नव्हते, म्हणून ११ जागांवरील सर्व अर्ज बॅड झाले होते. त्यावर सदर नियमाला आक्षेप घेणाऱ्या धनराज मुंडे यांच्या प्रलंबित याचिकेवरील सुनावणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर २ मार्च रोजी झाली होती. सहकार मंत्र्यांनी यावरील निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी सहकार मंत्र्यांनी त्याबाबत आदेश काढले असून धनराज मुंडे यांची याचिका फेटाळून लावत जिल्हा बँकेच्या उपविधीतील 'त्या ' नियमात बदल करण्यास अथवा स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या ११ जागा रिक्तच राहणार आहेत. 

Advertisement

Advertisement