Advertisement

चक्क मंडपात दहावीची परीक्षा

प्रजापत्र | Friday, 20/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२० (प्रतिनिधी): दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विदयालयात जागेअभावी मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

        एकीकडे शिक्षण विभागाने कॉपी मुक्त अभियान सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सिसिटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बीड जिल्ह्यात अनेक परीक्षा केंद्रावर शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.बीड तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने आणि शाळेला चारच खोल्या असल्याने शाळेसमोर चक्क मंडप टाकण्यात आला आहे. मंडप टाकून डेस्क मांडून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली आहे.यामुळे गावात जणूकाही एखादे लग्न असल्याप्रमाणे मंडप टाकून शाळेने परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटणारा आहे. याबाबत शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement