धारुर दि.२०(प्रतिनिधी): येथील घाटामध्ये धोक्याच्या वळणाधर सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला असून, सिमेंटचे पोते रस्त्यावर पसरल्याने रस्ता बंद पडून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. सकाळी १० सुमारास अपघात घडून ही दुपारी १२ पर्यंत हा रस्ता सुरू झालेला नव्हता यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
धारुर येथून जाणारा खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग या घाटातून जातो, पण घाट आणि यास लागून असलेला एकूण १२ कि.मी. रस्ता अरुंद आहे. यामुळे नियमित येथे अपघात घडत आहेत. तर धारुरचा घाट आणि अपघात हे समीकरण बनले आहे. येथे नेहमीच अपघात घडतात यामध्ये अनेक निष्पाप यांचे बळी गेले आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. पण तरीही या घाटाची दुरुस्ती काही होत असून, अनेकांनी आश्वासन दिली पण ती वांझोटी ठरली आहेत. आज शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धारुर घाटात एक १४ टायरचा ट्रक सिमेंट घेऊन जाताना वळणावर पलटी झाला आहे, यामुळे आतील सर्व सिमेंटचे पोते हल्यावर पडले असल्याने हा सता पूर्णपणे बंद पडला आहे. जवळपास दोन तास झाले तरी रस्ता बंद अररवाने दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवाशी खोळंबून पडली आहेत. यामुळे अनेकांना मार्ग बदलून तर काहींना मोठा कळला घालून प्रवास करावा लागला आहे. सततच्या अपघातामुळे असंतोष पसरला आहे. या अपघातात मात्र सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. मात्र आर्थिक नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा
