बीड दि.४ - येथील एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नौकरी करीत असलेल्या महिलेचा त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बीड येथील बीड येथील मा.विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री डी. एन. खडसे यांनी दिनांक 04/03/2021 रोजी पाच वर्ष सश्रम कारावास व 8,000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दि.14/11/2017 रोजी बीड येथील एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नौकरी करीत असलेल्या महिलेचा त्याच महाविद्यालयातील प्राध्यापक गजानन नरहरी करपे रा. स्वराज्य नगर, बीड याने पिडीतेच्या दुरध्वनी क्रमांकावर वॉट्सॲप द्वारे अश्लील विडीओ असलेली लिंक पाठवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले होते. त्यावरून महाविद्यालय प्रशासनाने गजानन नरहरी करपे यास निलंबीत केले होते. मात्र आरोपीने पुन्हा पिडीतेस रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला होता.
घडलेल्या घटनेच्या आनुषंगाने पिडीतीने पोलीस ठाणे शिवाजीनगर अंतर्गत गु.र.नं.160/2018 कलम 354(अ),354(ड),504,506 भादवि सह कलम 3(1)(r) (s) (w) अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयम व 67(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनीयम अन्वये फिर्याद नोंदवली होती. नमुद प्रकरणांचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी करून आरोपीताविरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले.
दरम्यान आरोपीताविरुध्द दिसुन आलेल्या पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयाने आरोपीतास दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम करावास व एकुण 8,000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
बातमी शेअर करा