अविनाश इंगावले
गेवराई- तालुक्यातील दैठण फाट्यावर चंद्रकांत उंदावत या सराफा व्यापा-याकडील 15 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग चोरट्यानी लुटल्याचा प्रकार चार दिवसापूर्वी घडला होता. यावेळी गेवराईत सराफ व्यापारी आणि कपासाच्या व्यापाऱ्याला भर दिवसा लुटण्यात आले होते. अखेर गुरुवारी (दि.4) दुपारी स्थानिक गुन्हे शाखाने गेवराईतून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गेवराई शहरातील दोन वेगवेगळ्या भागात व्यापाऱ्यांना 25 लाखाला भर दिवसा लुटण्यात आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस चोरट्याच्या शोधात होते. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखाने सरफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून यावेळी गेवराईतील एका सोने खरेदी करणाऱ्या सराफला ही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.दरम्यान कपासाच्या व्यापाऱ्याला लुटणारे आणखी मोकाट असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
बातमी शेअर करा