Advertisement

महिला व मुलींना कपडे काढून नाचवले

प्रजापत्र | Wednesday, 03/03/2021
बातमी शेअर करा

जळगाव – शासकीय वसतिगृहातील महिला आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे .विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांच्या हजेरीत घडला आहे .याप्रकरणी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत .

शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाचे मार्फत निराधार आणि अत्याचार ग्रस्त महिलांच्या मुलींच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. जळगावच्या आशादीप वस्ती गृहातील महिला आणि मुलींना पोलिसांनी आणि अज्ञात व्यक्तींनी पैसे काढून नाचविण्यात आल्याची तक्रार या महिलांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे

संदर्भात महिलांनी वसतीगृहाच्या खिडकीतून बोलतांना आपल्यावर अन्याय अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करीत असल्याचं महिलांनी म्हटलं आहे.

या संदर्भात इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांच्याकडे साहिल पठाण यांना एक व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओतून सगळी घटना स्पष्ट होत आहे. त्यानंतर मंगला सोनावणे आणि फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता दिला आहे.

‘या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. या निवेदनातील आरोपांची गंभीर दखल घेतली असून त्या संदर्भात आपण चौकशी समिती गठीत केली आहे. ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपासकरून जो अहवाल देईल त्यानुसार जर त्यात काही तथ्य आढळून आले तर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
 

Advertisement

Advertisement