Advertisement

रात्री उशीरा येणार कोरोनाचे प्रलंबित अहवाल

प्रजापत्र | Monday, 13/07/2020
बातमी शेअर करा

बीड दि.13 (प्रतिनिधी)ः जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 296 प्रलंबित स्वॅबचे अहवाल आज रात्री उशीरा प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यात परळीतील रविवारच्या प्रलंबित 128 नमुन्यांसह सोमवारी पाठविण्यात आलेल्या 168 स्वॅबचा समावेश आहे. बीडमधून सर्वाधिक 104 स्वॅब पाठविण्यात आले आहेत. रात्री उशीरापर्यंत हे सर्व अहवाल प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Advertisement

Advertisement