गेवराई-शहरापासून जवळच असलेल्या दोन वेगवेगळ्या भागात चोरटयांनी शनिवारी (दि.२७) भरदिवसा दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या दोन घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैठण फाट्यावरून गेवराईकडे येत असतांना सराफ व्यापारी चंद्रकांत उदावंत यांच्या बॅगमधील ५० ग्रॅम सोने चोरटयांनी मोटारसायकलवरून येत बॅग हिसकावून घेत लुटले. यात ५ लाखांचा ऐवज होता.तर गेवराई शहरातील हॉटेल डिसेंटजवळ कापूस व्यापारी हरिभाऊ गुट्टे (रा.वैजापूर,जि.औरंगाबाद) यांच्याकडे कापसाची १० लाखांची रक्कम बॅगमध्ये होती.ही रक्कम या चोरटयांनी धूम स्टाईल चोरी करीत लांबवल्याने खळबळ उडाली.दोन्ही घटना दुपारी १ ते २ च्या दरम्यान घडल्याची माहिती असून भरदिवसा गेवराईत दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.रात्री उशिरापर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बातमी शेअर करा