Advertisement

बाप,लेकीसह चुलत्याचा विजेच्या खांब्याला चिटकून मृत्यु

प्रजापत्र | Monday, 13/07/2020
बातमी शेअर करा

बीड-शहरातील भगवान विद्यालयाजवळ सोमवारी (दि.१३) महावितरणच्या विद्युत खांब्याला चिटकून बाप,लेकीसह चुलत्याचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 
श्रेया वडमारे,तुळशीराम वडमारे आणि बाळू बापूजी वडमारे असे मृतांची नावे आहेत.भगवान विद्यालयाजवळील विद्युत खांबाला सुरुवातीला श्रेया चिटकल्यानंतर तिला वाचविण्यासाठी तिचा चुलता बाळू वडमारे यांनी धाव घेतली.यावेळी दोघेही खांब्याला चिटकून बसले, त्यानंतर या दोघांना सोडविण्यासाठी गेलेला मुलीचा बाप तुळशीराम वडमारे हेही विद्युत खांबाला चिटकून बसल्याने या तिघांचा यामध्ये मृत्यु झाला असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.दरम्यान या घटनेमुळे वडमारे परिवारात दुःखाचा डोंगर पसरला आहे. 

 

Advertisement

Advertisement