बीडः जिल्हयातुन शनिवारी आणि रविवारी पाठविण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ६३१ स्वँबपैकी १९५ चा अहवाल प्राप्त झाला असुन त्यात ९ रुग्ण कोरोना positive आढळले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा १०२ झाला आहे. आज पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे.
Positive रुग्णांमध्ये चौसाळा येथील 3, बीड शहराच्या शाहू नगर, तुळजाई नगर, संत तुकाराम नगर, भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील प्रत्येकी एक आणि आष्टी व शिरुर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.तर परळीचे अहवाल प्रलंबित आहेत.आजच्या अहवालामुळे परळी शहर व तालुक्याची धाकधुक कायम आहे. प्रशासनाने अगोदरच परळीची टाळेबंदी दोन दिवसांनी वाढविली आहे.
बातमी शेअर करा